आता लढाई संपली, तुमचे कर्म वाट पाहतेय. तयार रहा- राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

आता लढाई संपली आहे. माझ्या वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. तुमचे कर्म तुमची वाट पाहतेय… तयार रहा, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

मोदींच्या टीकेला राहुल यांनी ट्विटरद्वारे उत्तर दिले आहे… मोदीजी, लढाई तर आता संपलेली आहे. आपले कर्म आपली वाट पाहत आहे. स्वत:च्या मनातल्या गोष्टी माझ्या वडिलांकर थोपवणेही आता आपल्याला वाचवू शकणार नाही, असा पलटवार राहुल यांनी केला आहे.

प्रियंका गांधी वढेरा यांनीही एका अनियंत्रित सनकी व्यक्तीने स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, अशा शब्दांत मोदींवर निशाणा साधला आहे. राजीव गांधींवरील टीकेला अमेठीची जनताच उत्तर देईल. मोदीजी, हे खरेच आहे, हा देश धोकेबाजांना माफ नाही करत, असे प्रियंका यांनी म्हटले आहे.