
दिल्ली दंगल प्रकरणी पोलिसांनी जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते उमर खालिद आणि विद्यार्थी शर्जील इमाम यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी सख्त बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दाखल झालेल्या या खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ राव यांच्याकडे खालिद आणि इमाम यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
खालिद आणि इमाम यांच्यावर दंगा, बेकायदेशीरपणे एकत्रित येणे, गुन्हेगारीचा कट रचणे, हत्या, धर्म, भाषा, जात इत्यादींच्या आधारे वैरभाव वाढविण्यासारख्या आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत नागरिकत्व कायद्यात बदल करण्यासाठी समर्थक आणि विरोधकांमधील हिंसाचारानंतर 24 फेब्रुवारीपासून जातीय संघर्ष सुरु झाला होता. ज्यात 53 लोकांचा मुत्यू झाला होता, तर 200 लोकं गंभीर जखमी झाले होते.
























































