
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
टिपू सुलतानच्या पुण्यतिथीनिमित्त त्याचे स्मरण केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी कौतुक केले आहे. मी खान यांना वैयक्तिकरीत्या ओळखतो. हिंदुस्थानी उपखंडाच्या इतिहासात त्यांना खरंच रस आहे. ‘महान हिंदुस्थानी नायकाची आठवण पाकिस्तानातल्या नेत्यांना येते हे दुःखदायक’, असे टि्वट करत थरूर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
टिपू सुलतानच्या पुण्यतिथीनिमित्त 4 मे रोजी इम्रान खान यांनी एक टि्वट केले होते. ‘या माणसाचे मला नेहमी कौतुक काटते. गुलामासारखे जगण्याऐवजी त्यांनी स्वातंत्र्याची निवड केली. त्यासाठी ते लढले आणि लढता लढता त्यांनी मरण पत्करले असे त्यांनी म्हटले होते.’ याबद्दल शशी थरूर यांनी खान यांचे कौतुक केले आहे.
























































