नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपची सह्यांची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजप सदस्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱयांवर जोरदार घोषणाबाजी केली आणि नवाब मलिक यांच्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लावलेल्या फलकावर विरोधकांनी सह्या केल्या

भाजपकडून विधान भवनाच्या पायऱयांजवळ नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बॅनर ठेवला होता. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

उपाध्यक्षांनीही चुकून सही केली

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आमदारांनी सह्यांच्या मोहिमेत राबवली. नेमके त्याचवेळेस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेदेखील विधान भवनात दाखल झाले. त्यावेळी भाजप आमदारांनी त्यांनादेखील या बोर्डावर सही करण्याची विनंती केली.  नरहरी झिरवळ यांनी अनावधानाने यावर सहीदेखील केली. मात्र नबाव मलिकांच्या राजीनाम्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे हे नंतर लक्षात आल्याने त्यांनी कपाळावर हात मारला.