
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
जम्मु-काश्मिर पुलगामा येथील भारतीय जवानावर दहशतवादी हल्ला करण्यार्या पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक करा व बदला घ्या, असा ठराव डोणगाव ग्रामपंचायतने करुन तो ठराव पंतप्रधानांना पाठवला आहे.
पुलगाम येथे जवानावर दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहे. त्यामुळे पाकिस्तान विरोधी जनमाणसात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत असून आज दिवसभर पाकिस्तानी झेंडा जाळणे, निषेध सभा, श्रद्धांजली सभा पार पडल्या. परंतु मेहकर तालुक्यातील सर्वात मोठ्या डोणगाव ग्रामपंचायतने तातडीने ग्रामपंचायत कमेटीची सभा बोलावून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानचा निषेध करीत संपूर्ण ग्रामपंचायतने एक ठराव घेवून १५ दिवसात पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करा व राजकिय व्यापारी संपूर्ण संबंध तोडा अशी मागणी एकमुखाने केली आहे.
सदर ठरावाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठवली आहे. सदर ठरावावर प्रभारी सरपंच जोईपखाँ बिस्मील्लाखाँ, सदस्य अर्जुनराव वानखेडे, अब्दुल साबीर अब्दुल गफ्फार, शेषराव पळसकर, सुनील आखाडे, सईद नूर सै. हबीब अतार, अतुल बेदरकर, अनुराधा धांडे, पुष्पा जाधव, दिपाली टाले, फराना बी कौसर खान, संगीता नंदेवार, सगीराबी शाहनूरखॉ, अविनाश बेदरकर, मंगला बाजड, सिमा परमाळे, उषा खोडके, चांदबी कासम बागवान यांच्या स्वाक्षर्या आहे.





























































