लोकशाही, धर्मनिरपेक्षतेसह अनेक धडे CBSE बोर्डाने अभ्यासक्रमातून वगळले

800

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने इयत्ता 9 वीच्या अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा वगळला आहे. CBSE बोर्डाने 9 वी ते 12 वी इयत्तेच्या अभ्यासक्रमातील 30 टक्के अभ्यासक्रम वगळला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, लोकशाहीचे धडे मिळणार नाहीत.

इयत्ता 11 वीच्या अभ्यासक्रमात देशाची संघ राज्य पद्धत, राज्य सरकार, नागरिकता, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्ष या विषयावरील धडे वगळण्यात आले आहे. इयत्ता 9वीच्या समाजशास्त्र विषतात पाच धडे वगळले आहेत, त्यात लोकशाहीचा अधिकार सारखा महत्त्वाचा विषयही वगळण्यात आला आहे.

इयत्ता 11 वीच्या अभ्यासक्रमात शेतकरी, जमीनदार, राज्य, विभाजब, राजद्रोह, द बॉम्बे डेक्कन आणि द डेक्कन राईट्स कमिशन हे धडे वगळण्यात आले आहे. हे धडे शेतकर्‍यांनी सरंजामदारांच्या विरोधात केलेल्या संघर्षावर आधारित होते. तसेच संविधानातील भारतीय संघराज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचा विकास हे धडेही वगळण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या