शिवशक्ती कबड्डी : व्यावसायिक महिला गटात देना बँकेचा चुरशीचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई – शिवशक्ती महिला संघाने ना.म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यात आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत व्यावसायिक महिला गटात देना बँक संघाने जे.जे. हॉस्पिटल संघावर 24-19 अशी 5 गुणांनी मात करीत आपली विजयी दौड सुरू ठेवली, प्रतीक्षा तांडेल (चढाया) आणि ज्योती डफळे (पकडी) यांनी देना बँकेच्या विजयात सिंहाचा वाट उचलला. पराभूत जे.जे. रुग्णालयाच्या अक्षता कुटे (चढाया) हिची झुंज एकाकीच ठरली. ब गटात भवानीमाता संघाने नवोदित क्रीडा मंडळ संघावर 31-29 अशी 2 गुणांनी मात केली. भवानीमाताच्या सुशांत धाडवे (चढाया) व चेतन साळवी (पकडी) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याच गटातील अन्य लढतींत व्ही.एन.के.एम. संघाने जयभारत सेवा संघावर 30-25 अशी 5 गुणांनी मात करीत चुरशीचा विजय मिळवला. विजयी संघाचे शिरीष पांगम (चढाया) आणि अक्षय जगताप (पकडी) यांनी चमकदार खेळ केला.