लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्याना देवरुख पोलिसांचा दणका!

लॉकडाऊनच्या काळात देवरुख पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. सह्याद्रीनगर, मार्लेश्वर तिठा, माणिकचौक, एस टी स्टॅंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मातृमंदिर नाका अशा ठिकाणी पोलिस कर्मचारी दिवस रात्र तैनात आहेत.

देवरुखचे प्रवेशद्वार असलेल्या सह्याद्रीनगर येथे वाहन तपासणीचे काम जोरात सुरु आहे. यातून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्याना दणका दिला जात आहे. आज सकाळी देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, गुप्त वार्ता विभागाचे किशोर जोशी, विश्वास बरगाळे, रितेश कांबळे यांच्या उपस्थितीत विनाकारण फिरणाऱ्या अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या