देशी दारू चोरीप्रकरणी दोघांना अटक, मुद्देमालही जप्त

580

देशी दारूच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून दारूच्या 30 खोक्यांची चोरी झाली होती. या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी ईदेवाडी येथे राहणाऱ्या अक्षय शिरसागर (25) आणि अंकुश शिंदे (24) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांकडे पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे यांनी विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला

याबाबत 31 मार्चला उल्हास कोल्हे यांनी तक्रार दिली होती. या दोन्ही आरोपींकडून जालना तालुका पोलिसांनी चोरी केलेल्या खोक्यांपैकी देशी दारूची चार खोकी आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल, असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या