रेड टीमला पकडण्यात देवगड पोलिसांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सागर कवच अभियानांतर्गत देवगडच्या समुद्रामध्ये संशयास्पद बोट दुपारी 3:40 वाजता 10 नॉटिकल मध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळाल्यावर सागरकन्या पोलीस स्पीड बोटीवर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, शकील अहमद, सखो तरवडकर यांनी सदर बोटीचा पाठलाग करून सदर बोट ताब्यात घेतली. यावेळी सदर बोटीमध्ये रेड टीमचे दोन पोलीस अंमलदार व तटरक्षक दलाचे एक अंमलदार असे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना मिळून आले. तसेच सदर रेटिंग कडे डमी बॉम्ब मिळून आलेला आहे. सदरच्या रेटिंगच्या बोटीचे पीटीडीएस पदकामार्फत असून तपासणी करण्यात येत आहे. तसेच याबाबत ठाणे दैनंदिनी मध्ये नोंद घेण्यात आलेली असून नमूद रेड टीम यांना सायंकाळी 6.00 वाजता त्यांचे कार्य समाप्त झाल्याने मोकळीक करण्यात आलेली आहे. पुढील घुसखोरी रोखण्यासाठी सतर्क पेट्रोलिंग व सागर गस्त नेमण्यात आलेली आहे. पेट्रोलिंग सुरू आहे. रेड टीमला पकडण्यात देवगड पोलिसांना यश मोहीम यशस्वी करण्यासाठी देवगड पोलिसांनी कसली होती.