देवबाग समुद्रात बोट उलटली, 9 पर्यटक बुडाले; एका महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोटिंग सफर करत असताना पर्यटक बोट समुद्रात पलटी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी देवबाग संगम येथे घडली. या दुर्घटनेमध्ये 9 पर्यंटक बुडाले असून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

ठाणे व कल्याण येथील पर्यटक मालवण देवबाग येथे पर्यटनासाठी आले होते. सोसाट्याचा वारा आणि जोरदार लाटांमुळे बोट हेलकावे खात होती. याचवेळी सर्व पर्यटक एका बोटीच्या एका बाजूला गेले, त्यामुळे बोट पलटी झाली. यामुळे 5 महिला, 3 लहान मुले व एक पुरुष असे 9 पर्यटक समुद्रात फेकले गेले. यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र माया आनंद माने या वृद्ध महिलेचा याच मृत्यू झाला आहे.

दोन महिला व एका लहान मुलांवर अधिक उपचार सुरू आहेत. मात्र आठही पर्यटकांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.