काँग्रेस पक्षाला एवढ्याच जागा मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भविष्यवाणी

2159

काँग्रेस नेत्यांना राज्यात दाखवायला तोंड नाही, त्यांचे नेते बँकॉकमध्ये गेले होते. त्यांना गळ घातली तेव्हा राहुल गांधी राज्यात दाखल झाले. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रविवारी वर्सोव्यात झालेल्या एका सभेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणले की, ”मागच्या वेळी काँग्रेसच्या 42 जागा आल्या होत्या. राहुल गांधींना माहित आहे की, कितीही डोकं आपटलं तरी राज्यात 24 जागाही येणार नाहीत. हे त्यांना चांगलच माहित होतं. म्हणून ते राज्यात यायला तयार नव्हते. मला वाटलं ते हरयाणा किंवा वायनाडमध्ये असतील. नंतर बातम्यांमध्ये वाचले की ते बँकॉकमध्ये आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद म्हणाले होते की जेव्हा वेळ येते तेव्हा आमचे नेते पळ काढतात. अखेरच काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना फोन केला. तेव्हा नेते राहुलना म्हणाले की आमचे आधीच थोबाड आपटलंय, लोकांना कसे सांगू की निवडणुका सुरू आहेत आणि आमचे नेते बँकॉकला गेले आहेत. किमान तोंडा दाखवयला तरी या असे काँग्रेस नेते राहुल गांधींना म्हटले.”

पाहा व्हिडीओ

राहुल गांधींवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. राहुल गांधी यांची कॅसेट अडकली आहे. लोकसभा पराभवातून राहुल काहीच शिकले नाही असेही फडणवीस म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या