शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्यानंतर आता फडणवीसांनीही त्याला उत्तर दिले आहे. पवार साहेब मोठे आहेत. त्यामुळे मोठय़ांना फार उत्तर देता येत नाहीत. मात्र आपण असेही म्हणू शकतो की, शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहे. राजकारणात असे बोलावे लागते, असे ते म्हणाले.

गोवा दौऱयावर असलेले फडणवीस म्हणाले, वक्तव्यावर बोलताना सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे खरे आहे, परंतु त्यासाठी आम्ही हातपाय गाळून बसलो नाहीत. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, पण याच्या खूप पुढे गेलो. गेल्या दोन वर्षांत मी राज्य पिंजून काढले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे. पूर, वादळ, अतिवृष्टी या काळात आम्ही लोकांमध्ये आहोत. लोकांचा रोष सरकारबद्दल आहे आणि तो संघटित करण्याचे काम आम्ही करतोय. आम्ही जनतेचे लोक आहोत आणि जनतेकरिता काम करत आहोत, असेही ते म्हणाले.