
1857च्या उठावात पण फडणवीसांचे योगदान असेल असा सणसणीत टोला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा एकही शिवसैनिक, नेता तेथे हजर नव्हता या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची आदित्य ठाकरे यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. सध्या राममंदिर निर्माणाचे काम चांगले सुरू आहे. देशात इंधन दरवाढ, महागाई भयंकर आहे. या विषयावरसुद्धा राज्यातील विरोधी पक्षाने आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाने बोलायला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार अडलेल्यांना मदत करतंय. जनतेची सेवा करतंय. गोरगरीबांसाठी काम करतंय. म्हणजेच राज्यातील आघाडी सरकार जनतेची चूल पेटवण्याचं काम करतंय, पण राज्यातील काही विरोधक जनतेची घरं पेटविण्याची कामं करताहेत, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.






























































