
पुरळ कोंडामा तीठा येथे दुचाकी व सुमो गाडी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दिनेश भिकाजी गावकर राहणार अनसुरे आडीवाडी तालुका राजापूर याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद विजयदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे बंधू संतोष भिकाजी गावकर यांनी दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरळ कोंडाम तीठा येथे दुचाकी व सुमो गाडी यांच्यामध्ये अपघात होऊन दिनेश गावकर (36) यांचा मृत्यू झाला आहे. याविषयी गावकर यांचे बंधू संतोष गावकर यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, माझा भाऊ दिनेश भिकाजी गांवकर हा 20 ऑक्टोंबर 2022 रोजी मोटार सायकलचे स्पेअरपार्ट खरेदी करण्यासाठी म्हणुन देवगड येथे आलेला होता व परत घरी जात असताना देवगड ते पडेल याच दरम्यान पुरळ कानडेवाडी याने त्याचे ताब्यातील टाटा सुमो गाडी ही हयगयीने व अविचाराने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवून माझा भाऊ दिनेश भिकाजी गांवकर याच्या ताब्यातील हिरो पेंशन या गाडीला ठोकर देवुन अपघात केला. त्याला देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. याप्रकरणी अधिक तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.































































