देवकरा येथे अचानक पोकलेनचा स्फोट; दोन ठार, एक जखमी

किनगाव जवळच असलेल्या देवकरा गावाजवळ शेतकऱ्याची विहीर खोदण्यास पोकलेन – (जे.सी.बी) आली होती त्यात अचाणक मोठा स्फोट होऊन दोन जागीच ठार तर एकजन जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत असे की, देवकरा गावाजवळ शेतकरी प्रभाकर विनायक मुरकुटे यांच्या शेतात – विहीर खोदण्याकरीता पोकलेन (जेसीबी) दि. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्यान शेतातील विहीर खोद कामासाठी जात असताना तिचा अचानक स्फोट होऊन शेतकरी प्रभाकर विनायक मुरकुटे (63, रा. देवकरा) व दहीफळे बाबुराव पांडूरंग (68, रा.कोळवाडी) हे जागीच ठार झाले असून जेसीबी ऑपरेटर (चालक) भगतराज नारायण सारेआम (रा. चिलखा, मध्य प्रदेश) हे जखमी झाले आहेत.

त्यांना शासकिय दवाखाना अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी श्रीकृष्णा प्रभाकर मुरकुटे (38) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पो.हे.का. तोपरपे यांच्याकडे देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या