देवळाली प्रवरात पावसामुळे घराच्या भिंती कोसळल्या, महसुल विभागाकडून वाळूंज कुटुंबाची मदतीची अपेक्षा

देवळाली प्रवरा शहरामध्ये दोन-तीन दिवसांपासून सलग झालेल्या पावसामुळे एका कुटुंबाचे राहते घर कोसळल्याने पीडित कुटुंबाला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. महसूल विभागाला याची कल्पना असतानाही महसुल विभागाचा एक ही अधिकारी याठिकाणी भेट देण्यासाठी फिरकलाच नसल्याचे पीडित कुटुंबाने सांगितले.

देवळाली प्रवरा येथील दत्तनगर या ठिकाणी रहिवासी असणारे पोपट काशिनाथ वाळुंज यांच्या राहत्या घराची सलग झालेल्या पावसामुळे भिंती कोसळल्या ही घटना रविवारी दि. 24 रोजी मध्यरात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडली. भिंत बाहेरच्या दिशेने कोसळल्याने दुर्दैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांला इजा झाली नाही. महसूल प्रशासनास याबाबतची कल्पना देऊनही महसूल प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही. प्रशासनाने लक्ष देऊन पीडित कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी वाळुंज कुटुंबीयांनी प्रशासनास केली आहे.

यावेळी उपस्थित संतोष रावसाहेब वाळुंज, रावसाहेब काशिनाथ वाळुंज, राजेंद्र रावसाहेब वाळुंज, पार्वताबाई रावसाहेब वाळुंज, पप्पू कुऱ्हाडे, शकुंतला नामदेव वाणी, पाराजी केशव डवन आदींनी घटनास्थळी उपस्थित राहुन मदत केली.