बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिद झियांना शिक्षामाफी मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्टाचारप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना ठोठावण्यात आलेली 17 वर्षांची शिक्षा माफ होण्याची शक्यता आहे. 74 वर्षीय खालिदा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना शिक्षामाफी मिळावी अशी विनंती खालिदा यांच्या कुटुंबीयांनी बांगलादेश सरकारला केली आहे. खालिदा या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) प्रमुख असून त्या देशाच्या माजी पंतप्रधानही आहेत. त्या भ्रष्टाचाराच्या 2 प्रकरणांत 8 फेब्रुवारी 2018 पासून 17 वर्षांची शिक्षा भोगत आहेत, पण खालिदा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना सरकारने 6 महिन्यांच्या जामिनावर सोडले होते. मात्र खालिदा यांनी या काळात आपल्या घरातच राहावे आणि सरकारच्या परवानगीशिवाय देश सोडू नये असे बजावण्यात आले होते. खालिदा यांची बिघडलेली प्रकृती पाहून त्यांचा जामीन आणखी 6 महिन्यांनी वाढवण्यात आला होता. आता 25 मार्चला त्यांना देण्यात आलेली दुसरी मुदतवाढही संपत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार आजारी खालिदा यांची शिक्षा निलंबित करता येईल का, याबाबत देशाच्या कायदे मंत्रालयाचा विचार घेतला जात आहे, असे स्पष्टीकरण बांगलादेशचे गृहमंत्री असादुज्जमान खान कमाल यांनी दिली आहे.