बौद्धजन सेवा संघाचा वाडा येथे धम्मोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवगड

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, विजयदुर्ग यांच्यावतीने रविवार 21 ऑक्टोंबर रोजी वाडा (लुंबिनी बुद्धविहार) येथे धम्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रबुद्ध विकास मंडळ व रमाई महिला मंडळ, वाडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रम पुढिलप्रमाणे- प्रथम सत्र सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वा. धम्मध्वजारोहन, उदघाटन तर बौद्धाचार्या, आयु उत्तरा उदयचंद्र जाधव (लांजा) यांचे बुद्ध ते बाबासाहेब या विषयावर जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 1.30 ते 2.30 या वेळेत सहभोजन करण्यात येणार आहे. तसेच दुसऱया सत्रात दुपारी 2.30 ते सायं.4.30 वा. जागर क्रांतिचा या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.