धारावीत आतापर्यंत 68,495 जणांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीत आता लसीकरणाने वेग पकडला आहे. धारावीत आतापर्यंत 68 हजार 495 जणांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, दुसऱया लाटेदरम्यान धारावीत आज 13व्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. दादरमध्ये 3 तर माहीममध्ये 2 रुग्ण सापडले.

धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेवरही नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे दररोजच्या रुग्णसंख्येबरोबर सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. धारावीत सीटी बँक आणि जसलोक रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 25 हजार 630 जणांचे तर पालिकेकडून 42 हजार 875 असे एकूण 68 हजार 495 जणांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जी-उत्तरचे आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दिली.