धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी! साईबाबांविषयी वादग्रस्त विधानाचा साईभक्तांकडून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला असून, धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

धीरेंद्र कृष्ण शास्त्र्ााr यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करीत असतात. साईबाबा देव आहेत की नाही हे सिद्ध करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धीरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे, त्यांची अक्कल ठिकाणावर येईल, अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

धीरेंद्र शास्त्र्ााrने साईबाबांविषयी केलेले वक्तव्य म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखे आहे. साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे साई संस्थानकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावे ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली-गेली. मात्र, आम्ही बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो. धीरेंद्र शास्त्र्ााrने महाराष्ट्राची संतपरंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धीरेंद्र शास्त्र्ााRना दिला आहे.

संतांवर आघात करणे हाच सनातनी धर्म आहे का? – बाळासाहेब थोरात

सध्या नवनवीन महाराज तयार होत असून, सरकार त्यांना संरक्षण देत आहे. हा देश बंधुभावाने चालवायचा की दंगलीने भरलेला करायचा, असे वाटून जाणारे हे सगळे वातावरण आहे. तथाकथित नवीन महाराज तयार होतात. त्यातीलच हे बागेश्वर महाराज आहेत. संत तुकारामांनंतर आता साईनाथांबद्दल त्यांनी वक्तव्य केले. साईबाबांबद्दलचे त्यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा हा प्रयत्न असून, संतांवर आघात करणे हाच सनातनी धर्म आहे का? असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. नवीन निर्माण झालेली आणि द्वेष पसरवणारी ही मंडळी असून, सरकारचे या गोष्टींना प्रोत्साहन असल्यासारखे दिसते. ही सगळी मंडळी द्वेष पसरवणारी आणि वर्णभेद निर्माण करणारी आहे. यांचा बंदोबस्त सरकार करत नसेल, तर लोकांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी धीरेंद्र शास्त्री आणि कालिचरण महाराज यांचा समाचार घेतला आहे.