
कारकीर्द मावळतीकडे झुकलेला महेंद्रसिंग धोनीला यंदाचा T20 वर्ल्ड कप खेळायला मिळेल की नाही याबाबत सध्या तरी तळ्यात-मळ्यात अशीच स्थिती आहे. आता आयपीएलचा मुहूर्त सापडल्याने धोनीच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. मात्र, आयपीएलमध्ये जुन्या लौकिकास साजेशी कामगिरी केली तरच धोनीचा T20 वर्ल्ड कप साठी विचार होणार आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगणारी यंदाची आयपीएल स्पर्धा ही धोनीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.
500 विकेट घेणारा मी शेवटचा वेगवान गोलंदाज
मधील वर्ल्डकपमध्ये अखेरचा सामना खेळलेला आहे. प्रदीर्घ विश्रांतीमुळे आता त्याला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
धोनीच्या निवृत्तीबाबत मॅनेजरचा मोठा खुलासा
रिषभ पंत आणि लोकेश राहुल हे नव्या दमाचे यष्टिरक्षक फलंदाज धोनीच्या मार्गात उभे असतील. त्यामुळे आयपीएलच्या सहाव्या हंगामात चांगली कामगिरी झाली नाही तर धोनीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद होतील.
कोरोनामुळे धोनीच्या कारकीर्दीला फुलस्टॉप?
39 वर्षांच्या दोन्हीचे टीम इंडियातील स्थान त्याच्या आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून असेल असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागेच सांगितले आहे. कोरोनामुळे चार महिने क्रिकेट बंद होते. त्यामुळे गोलंदाजांना पुन्हा लयीमध्ये परतण्याचे मोठे आव्हान असेल. अनुभवी धोनी याचा फायदा उठवण्यात कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.


























































