धोनी 2022 पर्यंत आयपीएल खेळणार, चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ विश्वनाथन यांचा विश्वास

412

गेल्या वर्षीपासून क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी आगामी आयपीएलसाठी सज्ज होतोय. यावेळी त्याच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांच्याकडून बुधवारी देण्यात आली आहे. यावेळी ते म्हणाले, महेंद्रसिंग धोनी 2021च नव्हे 2022 सालामध्येही आमच्या संघातून खेळू शकतो. कासी विश्वनाथन पुढे म्हणाले, महेंद्रसिंग धोनी सध्या रांची येथे इनडोअर ट्रेनिंगचा सराव करतोय. आम्हाला त्याची कोणतीही चिंता नाही. तो संघाची बांधणी नीट करू शकतो, असा विश्वासही पुढे त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत चेन्नई सुपरकिंग्जसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्येही महेंद्रसिंग धोनीचा समावेश असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या