चाहत्यांसाठी निराशाजनक न्यूज

432

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक निराशाजनक खबर आहे. अनुभवी धोनीने आपण नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱया बांगलादेशविरुद्धच्या टी-20 क्रिकेट मालिकेसाठीही उपलब्ध नसल्याचे निवड समितीला कळवले आहे. इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर माही टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत मैदानात उतरलेला नाही. प्रथमच सलग तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांपासून धोनी दूर राहिलेला दिसणार आहे.

महेंद्रसिंह धोनी विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत अखेरचा दिसला होता. त्यानंतर त्याने वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. 38 वर्षीय धोनीने लष्कराच्या प्रादेशिक सेनेतही महिनाभर सेवा दिली होती. जम्मू-कश्मीर सीमेवर लष्करी जवानांसोबत गस्त घालण्याचे काम धोनीने मानद् लेफ्टनंट कर्नल म्हणून केले. ऑगस्टमध्ये तो लष्करी सेवा दिल्यानंतर घरी परतला, पण टीम इंडियात परतण्याचे संकेत मात्र त्याने दिले नाहीत.

 

आपली प्रतिक्रिया द्या