‘बेस्ट’मध्ये पुन्हा डिझेल बस; पर्यावरणपूरक धोरण बासनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरण रक्षणासाठी ‘बेस्ट’मध्ये 100 टक्के इलेक्ट्रिक बसेस आणण्याच्या धोरणाला हरताळ फासत प्रशासनाने पुन्हा एकदा डिझेलवर चालणाऱया गाडय़ा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये डिझेलवरील 150 वातानुकूलित एसी बसेस घेण्यात येणार आहेत. यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणात वाढ झाली असल्यामुळे वाहनांमुळे होणाऱया प्रदूषणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’मध्ये सर्व गाडय़ा इलेक्ट्रिक आणण्याचे धोरण अवलंबण्यात येत आहे. यामध्ये 2027 पर्यंत ‘बेस्ट’ बस गाडय़ा 100 टक्के इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. यातच अचानक पुन्हा इलेक्ट्रिक बसगाडय़ांऐवजी डिझेल गाडय़ा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या ‘बेस्ट’ उपक्रमाकडे 3,228 बसेस असून 2026 पर्यंत 10 हजार बसेसचा समाकेश बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात होणार आहे. किशेष म्हणजे 10 हजार बसेस पर्याकरणपूरक असतील असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे. मात्र आता डिझेलकर धाकणाऱया मिनी कातानुकूलित बसेस भाडेतत्त्काकर घेण्याचा निर्णय घेतल्याने ‘बेस्ट’ला पर्यावरण संतुलनाचा विसर पडला का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

असा आहे बेस्टकडे गाडय़ांचा ताफा

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सद्यस्थितीत 3,228 बसेस आहेत. यापैकी 1,646 बसेस बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या असून 1,582 बसेस भाडेतत्त्काकरील आहेत. यामध्ये डिझेलकर धाकणाऱया 570 बसेस असून आणखी 150 कातानुकूलित डिझेलकर धाकणाऱया बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हणूनच घेतला निर्णय

काही महिन्यांपूर्की बेस्ट उपक्रमातील एका कंत्राटदाराने आपल्या कंत्राटी कर्मचाऱयांचा पगार वारंवार थकवल्याच्या प्रकारामुळे कर्मचाऱयांनी आंदोलने केली होती. याचा फटका बेस्ट प्रवाशांना बसला होता. त्यामुळे प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर सेवा थांबवण्याची कारवाई केली होती. या डिझेलवरील बस गाडय़ांची कमतरता भरून काढण्यासाठी  नव्या डिझेलवरील बस गाडय़ा घेण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.