डिझेलचा वापर करून बनवला पराठा!; फूड व्लॉगरचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज नवनवीन खाद्यपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक चंदीगडमधील धाब्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. येथे बबलू नावाच्या एका व्यक्ती धाब्यावर खाद्यपदार्थ विकतो. बबलूने असा दावा केला होता की, तो लोकांना वाहनांमध्ये वापरण्यात येणारे इंधन म्हणजेच डिझेलमध्ये तळलेले पराठे खाऊ घालतो. ते पराठे लोक मोठ्या चवीने खातात. एका फूड व्लॉगरने बबलूच्या धाब्यावर जाऊन त्याच्यासोबत व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओमध्ये बबलूने डिझेल पराठा बनवला असल्याचे सांगत होता. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यावर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओचे सत्य समोर आले आहे. ढाब्याच्या मालकाचे म्हणणे आहे की, हा दावा खोटा असून तो केवळ गंमत म्हणून चित्रित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना ढाब्याचा मालक चन्नी सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एएनआय वृत्तसंस्थेला त्याने मुलाखत दिली आहे. डिझेल पराठा असे काहीही आम्ही बनवत नाही. डिझेलमध्ये शिजवलेला पराठा कोणी कसा खाऊ शकतो, ही सामान्य बाब आहे. असे ते म्हणाले.

आमच्या ढाब्यावर रोज अनेक लोक येतात. इथलं जेवण आवडलं की त्याचे व्लॉग बनवतात. अशाच एका व्लॉगरने हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवले आहे. मात्र जेव्हा व्लॉगरला त्याची चूक समजली तेव्हा त्याने त्याबद्दल माफीही मागितली आहे. त्यामुळे खाऊन त्याचा त्रास होईल असे पदार्थ आपण कोणालाही देत नाही. तसेच ढाब्याच्या मालकाने डिझेलमध्ये शिजवलेल्या अन्नाचे व्हायरल दावे फेटाळले. आपल्या ढाब्यावर फक्त हायजिनिक अन्न दिले जाते. आम्ही कोणाच्या जीवाशी खेळत नाही. ढाब्यावर फक्त खाद्यतेल वापरले जाते, असे ते म्हणाले.