सहा दशकांत दिलीप कुमार यांनी केली एकच जाहिरात! दिग्दर्शक सुभाष घई यांनी सांगितली आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्लीचे कलाकार चित्रपटांपेक्षा जाहिरातींमधून कोटय़वधी रुपयांची कमाई करतात. मात्र सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये केवळ एकाच जाहिरातीत काम केले होते. तेदेखील कोणतेही मानधन न घेता. याबाबतचा किस्सा नुकताच निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

बॉलिवूडचे ट्रजेडी किंग दिलीप कुमार यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या, पुटुंबियांच्या मनात कायम राहतील. नुकताच निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर दिलीप कुमार यांच्या एका जाहिरातीचे पोस्टर शेअर करत म्हटलेय, ‘‘दिलीप पुमार नेहमीच आपल्या मित्रांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी आयुष्यात कधीही कोणत्याही जाहिरातीचे समर्थन केले नाही. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत कोणतीही जाहिरात केली नाही. मात्र फिल्म इंडिया मासिकाचे संपादक बाबूराव पटेल हे अपवाद होते. दिलीप पुमार यांनी केवळ बाबूराव यांच्या एका उत्पादनाची जाहिरात केली तीदेखील कोणतेही मानधन न घेता.’’ दिलीप कुमार यांनी सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’, ‘विधाता’ आणि ‘सौदागर’ या चित्रपटांत काम केले होते.