दिनकर पणशीकर यांना चतुरंग संगीत सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

चतुरंग प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केल्या जाणार्‍या चैत्र पालवी संगीतोत्सवात संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या बुजुर्ग संगीत साधकाला ‘चतुरंग संगीत सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यानुसार यंदाचा हा मानाचा पुरस्कार अंबरनाथ येथील ज्येष्ठ शास्त्रिय गायक पंडित दिनकर पणशीकर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र आणि 75 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  हा पुरस्कार म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत आहे. तसेच चतुरंग संगीत शिष्यवृत्तीसाठी शास्त्रिय गायन हेच ध्येय असलेली बदलापूर येथील गायिका प्रियंका भिसे हिची निवड झाली आहे. शनिवार, 27 एप्रिल रोजी सुयोग मंगल कार्यालय डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी 4 ते 7 या वेळेत होणार्‍या चैत्र पालवी संगीतोत्सवात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.