दिंडोशीच्या श्रीकृष्ण नगरमधील रहिवाशांना मिळाले हक्काचे घर; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिंडोशी येथील संतोष नगरमधील श्रीrकृष्ण नगर पुनर्वसन प्रकल्प मागील 10 ते 12 वर्षांपासून रखडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर या प्रकल्पाचे काम मार्गी लागले असून या 102 सदनिका धारकांना नुकतेच शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, किभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते  चावी वाटप करून घराचा ताबा देण्यात आला.

संतोष नगर येथील रखडलेला श्रीकृष्ण नगर पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागल्यामुळे येथील रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहेत. शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू तसेच नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे रहिवाशांनी शिवसेनेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. उर्वरित 221 सदनिका धारकांना डिसेंबर महिन्यात घरांचा ताबा दिला जाणार आहे.