हॉटेलचे बिल पाहून डेटवर गेलेला प्रियकर फरार…वाचा सविस्तर…

प्रियकर प्रेयसी एकमेकांना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी डेटवर जातात. मात्र, एका युवकाला आपल्या प्रेयसीला डेटवर बोलावणे महागात पडले आहे. त्या दोघांचे हॉटेलमधील जेवण झाले. त्यानंतर आलेले बिल पाहून प्रियकर फरार झाला. दोघांचे बिल एवढे कसे आले असा प्रश्न त्याला पडला होता. मात्र, त्याची प्रेयसी डेटवर येताना 23 मित्रांना सोबत घेऊन आली होती. त्यामुळे बिलाची रक्कम पाहून पलायन करण्याची वेळ तरुणावर आली. चीनच्या झोजियांग प्रांतात ही घटना घडली आहे.

सोशल मीडिया आणि फोन कॉलवर जवळीक वाढलेल्या तरुण-तरुणीने ब्लाइंड डेटची योजना आखली. प्रियकराने प्रेयसीला डेटचे आमंत्रण दिले. ते स्वीकरत तिने हॉटेलची निवड केली. त्या दोघांची ही पहिलीच भेट असल्याने दोघेही भेटीसाठी उत्सुक होते. ठरलेल्या वेळपूर्वीच प्रियकर हॉटेलमध्ये पोहचला होता. प्रेयसीला भेटण्यासाठी तो तयारी करत होता. टेबल सजवण्यापासून इतर सर्व सूचना हॉटेल प्रशासनाला त्याने दिल्या होत्या. तो वाट बघत असलेला क्षण जवळ आला. त्याची प्रेयसी हॉटेलमध्ये आली. त्यांची भेट झाली. ती त्याच्यासोबतच्या टेबलवर बसली.

प्रेयसी तिच्यासोबत नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी अशा 23 जणांना सोबत घेऊन आली होती. तरुणाला याबाबत माहित नव्हते. त्यांची भेट, बोलणे झाले. त्यांच्यात हास्यविनोदाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी जेवण मागवून एकत्र जेवण केले. त्यानंतर हॉटेलने तरुणाला बिल दिले. बिलाची रक्कम पाहून तरुणाला घाम फुटला. काहीतरी बहाणा सांगत तिथून तो निसटला आणि पसार झाला.

हॉटेलने तरुणाला 19,800 युआनचे (सुमारे 2 लाख 17 हजार रुपये) बिल दिले. बिलाची रक्कम पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे मोठ्या संकटात अडकण्याची शक्यता लक्षात घेत त्याने पळ काढला. फक्त दोघांचे एवढे बिल कसे आले, असा प्रश्न त्याला पडला होता. तरुण फरार झाल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाला शोधून काढले.

आपल्यासोबत डेटला आलेल्या तरुणाचा स्वभाव, मनोवृत्ती आणि उदारता बघण्यासाठी ब्लाइंड डेटला जाताना आपण आपल्यासोबत 23 मित्रमैत्रणींना नेल्याचे तरुणीने सांगितले. मात्र, तरुणाने पळ काढल्याने त्याची मनोवृत्ती दिसून आली असे तिने सांगितले. अखेर तरुणीने हॉटेलचे 2 लाखांचे बिल भरले. तर तरुणाने दोन टेबलचे बिल भरण्याचे मान्य केले. ते बिल भरल्यानंतर त्याची सुटका झाली.

आपली प्रतिक्रिया द्या