दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार प्रताप आसबे यांना जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील आघाडीचे शिलेदार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या नावे दिला जाणार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील आघाडीचे शिलेदार आणि समाजवादी चळवळीतील ध्येयवादी कार्यकर्ते दिनू रणदिवे यांचे 16 जून 2020 रोजी निधन झाले. त्यानंतर घेण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत रणदिवे यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता करणाऱया महाराष्ट्रातील पत्रकाराला दरवर्षी ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या पुरस्कारासाठी गठीत केलेल्या समितीने ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांची निवड केली आहे. गुरबीर सिंग, नरेंद्र वाबळे, प्राजक्ता वेळसकर आणि हारीस शेख हे या समितीचे सदस्य असून डॉ. भालचंद्र मुणगेकर अध्यक्ष आहेत.