
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. निक जोनससोबत केलेला तथाकथित साखरपुडा असो किंवा मग सलमानच्या भारतमधून घेतलेला काढता पाय. सध्या सर्वत्र प्रियांकाच प्रकाशझोतात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून निकचे एका महिलेसोबत फोटो व्हायरल होत आहेत. त्याच्यासोबत फोटोत असणारी ती सुंदर महिला दुसरी तिसरी कोणी नसून निकची आई डेनिस आहे.
प्रियांकाच्या भावी सासुबाई म्हणजेच निकची आई डेनिस मिलर जोनस या दिसण्यात प्रियांकाहूनही सुंदर असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. प्रियांका चोप्रासोबत डेनिस जोनसची तुलना केली जात आहे. डेनिस मूळच्या टेक्सासच्या रहिवासी असून १९८७ मध्ये निकचे वडील आणि गायक पॉल केविन जोनस सिनिअरसोबत त्यांनी लग्न केले होते. त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या केवळ १९ वर्षांच्या होत्या. वयाच्या २६व्या वर्षी त्यांनी निकला जन्म दिला.

आपल्या आईसोबतचे फोटो निक सोशल मीडियावर शेअर करत असतो. निकचा भाऊ केविन याने प्रियांका आमच्या घरच्यांना सून म्हणून पसंत असल्याचं म्हटल्याचंही बोललं जात आहे. मात्र, अजून निकच्या आईची प्रियांकाबाबत काहीही प्रतिक्रिया कळलेली नाही.































































