
देशात आज पुन्हा 25 पैशांनी डिझेल महागले आहे. त्यामुळे मुंबईतील डिझेलचा दर 96.68 पैसे एवढा झाला आहे. या वाढलेल्या दरामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याआधी शुक्रवारी प्रतिलिटर डिझेलच्या दरात 20 पैशांची वाढ झाली होती. दरम्यान वर्षभरात पेट्रोलच्या दरात 17 रुपये 22 पैशांची तर डिझेलच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे.





























































