
पाकिस्तानी सेनाप्रमुख आसिम मुनीर यांनी ऑपरेशन सिंदुरठसंदर्भात केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र. दैवी मदत मिळाली आणि संघर्ष थांबला, असे मुनीर यांनी एका कार्यक्रमात सांगितले. एकीकडे हिंदुस्थानची लढाऊ विमाने पाडल्याचा दावा करणाऱया मुनीरने हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे किती नुकसान झाले, याची कबुली दिली आहे.
मुनीर यांनी हे वक्तव्य 10 डिसेंबर रोजी इस्लामाबाद येथे झालेल्या नॅशनल उलेमा कॉन्फरन्समध्ये केले होते. त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स रविवारी स्थानिक वृत्त वाहिन्यांनी दाखविल्यानंतर पाकिस्तानच्या दावे किती पोकळ होते, हे सिद्ध झाले आहे. मुनीर म्हणाले, की ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानच्या विरोधात चिनी शस्त्रांनी नव्हे तर अल्लाहने मदत केली होती. आम्हाला ते जाणवले. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडली असती. मुनीरने यावेळी अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारवरही टीका केली. पाकिस्तानातील बहुतांश अंतर्गत समस्यांसाठी अफगाणिस्तानातून आलेले नागरिक जबाबदार असून पाकिस्तानी नागरिकांच्या रक्तपातासाठी अफगाणिस्तान दोषी आहे, असे मुनीर म्हणाले.


























































