
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या चाहत्यांना एक अत्यंत सुखद बातमी दिली आहे. लग्नाच्या तब्बल 10 वर्षांनंतर दिव्यांका आई होणार असून, तिने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या बेबी बंपचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना बातमी दिली आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया पांढऱ्या रंगाच्या पोशाखात ‘ट्विनिंग’ करताना दिसत असून त्यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका फोटोत विवेक दिव्यांकाच्या बेबी बंपला प्रेमाने धरून पोज देताना दिसत आहे. लवकरच आई-वडील होणार असल्याचा विलक्षण आनंद या जोडप्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे. आपल्या आयुष्यातील या नवीन वळणाबद्दल भावना व्यक्त करताना दिव्यांकाने म्हटले की, जेव्हा आपल्याला आपली कहाणी पूर्ण झाली आहे असे वाटते, नेमक्या त्याच वेळी आयुष्य त्यात एक सर्वात सुंदर अध्याय जोडत असते.
दिव्यांका आणि विवेक 2016 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतरच्या अनेक वर्षांत दिव्यांकाला अनेकदा फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आले होते, मात्र तिने नेहमीच ‘जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा मी आई होईन’ असे सकारात्मक उत्तर दिले होते. आता अखेर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांका सध्या सहा महिन्यांची गरोदर असून जून महिन्याच्या आसपास तिची प्रसूती होण्याची शक्यता आहे.




























































