दीपिका सिंहची बॉलीवूड एंट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोटय़ा पडद्यावरील लाडकी बहू आणि ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री दीपिका सिंह आता बॉलीवूडमध्ये एण्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘टीटू अंबानी’ असे तिच्या डेब्यू चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून अल्पावधीत त्याला पाच दशलक्ष ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटात दीपिका एका जबाबदार एकुलत्या एक मुलीची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत तुषार पांडे मुख्य भूमिकेत आहे. लेखक-दिग्दर्शक रोहित राज गोयल असून निर्माते दिनेश कुमार आहेत. 8 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.