
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड जिह्याला हादरवून टाकलेल्या ‘दिया जाईलकर’ मृत्यू प्रकरणाचे गूढ अखेर आज उकलले असून टीव्हीवरील क्राइम स्टोरी पाहून दियाची हत्या केल्याची नराधम आरोपीने कबुली दिली आहे. या हत्येचे गूढ उकलल्यामुळे आता आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
क्रूरकर्मा आरोपी सूरज करवरे व दियाच्या घरच्या मंडळीचा कसलाच वाद नव्हता. त्याला दूरदर्शनवरील क्राइम स्टोरी पाहण्याचा नाद होता. सूरजचा ज्या व्यक्तीजवळ वाद होता त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने या मालिकेतील कथेचा आधार घेत त्याला गुह्यात अडकवून कायमची अद्दल घडवण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आठ वर्षांच्या निरागस दियाची अमानुषपणे हत्या केली. त्याने दियाच्या घराजवळ बंद असलेल्या पडीक घरात नेऊन तिचे हातपाय बांधून तिच्या तोंडात बोळा कोंबला आणि गळा दाबून तिची हत्या केली. या हत्येचे खापर आरोपीने त्याची खुन्नस असलेल्या त्याच गावातील एका व्यक्तीवर फोडण्याकरिता त्याचा वापरात नसलेला बंद मोबाईल घटनास्थळी ठेवून पळ काढला. बंद मोबाईल, ग्रामपंचायत निवडणूक तसेच या बालिकेची दूर अंतरावर सापडलेली एक चप्पल यामुळे पोलीसदेखील चक्राकले होते. मात्र चाणाक्ष पोलिसांचा तपास सूरज करकरेच्या भोवती फिरू लागला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आकळल्या. ही हत्या नेमकी त्या बंद घरातच केली असल्याची कबुली सूरजने दिली आणि हत्याकांडाचे गूढ उकलले.


























































