पुलांवर नाचू नका, कोसळाल! महापालिका-पोलिसांकडून वार्ता ‘विघ्ना’ची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kalachowki-mahaganpati-2019
काळाचौकीच्या महागणपतीचे गुरुवारी मोठय़ा दिमाखात आगमन झाले. मंडळाचे अध्यक्ष विजय निपारे, सचिव अमन दळवी, प्रकाश राणे यांच्या चोख नियोजनात ही आगमन मिरवणूक पार पडली.

अवघ्या 15 दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे अनेक बडय़ा मंडळांच्या मूर्ती मंडपात विराजमान होण्यासाठी प्रचंड जल्लोषात निघू लागल्या आहेत. मात्र मुंबईतील अनेक पूल धोकादायक असल्यामुळे बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांनी पुलावर नाचू नये, अन्यथा कोसळाल असा धोक्याचा इशारा पालिका आणि पोलिसांनी गणेश मंडळांना दिला आहे.

मार्च 2019 मध्ये हिमालय पूल दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून अतिधोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. यात चिंचपोकळी आणि करी रोड पुलाकर अकजड काहनांना बंदी घालण्यात आली असल्यामुळे लालबाग, करी रोड, परळ, काळाचौकी परिसरातील काहतुकीला मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे लालबाग परिसरातील गणेश चित्रशाळांमधून निघणाऱया मोठय़ा मूर्ती आणि भव्य आगमन-विसर्जन मिरवणुकांमुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना पुलावर जास्त वेळ रेंगाळू नका, गर्दी करू नका अन्यथा पूल कोसळण्याचा धोका आहे असा इशारा दिल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आले असले तरी फक्त गणेशमूर्ती नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा जर्जर पुलांवर गर्दी केल्यास, जास्त वेळ मिरवणूक थांबवल्यास पुलावर दाब वाढून पूल कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा पुलांवर जास्त वेळ न रेंगाळता हे पूल शांतपणे आणि लवकरात लवकर पार करावेत अशा सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.

जम्मू-कश्मीरमधील वातावरण आणि गणेशोत्सवात होणाऱया मोठय़ा गर्दीमुळे अतिरेकी कारवाया होण्याचा धोकाही असतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळाच्या दहा कार्यकर्त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथकाकडून प्रशिक्षण द्यावे अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.

अनेक पूल बंद केल्यामुळे मिरवणुकीसाठी नवे मार्ग सुचविण्यात आले आहेत. या नव्या मार्गावर सरकारने सुरक्षा द्यावी अशी मागणी समन्वय समितीने केली असून या मार्गांवर सीसीटीक्ही आणि ड्रोन कॅमेऱयाची क्यकस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पुलांची सद्यस्थिती

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आढळलेल्या 29 पुलांपैकी आठ पूल पाडण्यात आले आहेत, तर काही पूल काहतूक आणि रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. यात किरकोळ दुरुस्ती सुचवलेल्या पुलांचे काम करण्यात आले असून नव्या पुलांचे बांधकाम आणि मोठी दुरुस्ती सुचवलेल्या पुलांचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.