मसूर, राजमा, चणा डाळ शिजवण्याआधी न विसरता ‘ही’ गोष्ट करा, गॅस होणार नाही

शाकाहारी लोकांसाठी डाळी आणि बीन्स हे प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहेत. वेगवेगळ्या डाळींमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. बहुतेक लोकांना डाळ चपाती किंवा डाळ भात खायला आवडते. परंतु काही लोकांना डाळ खाल्ल्यानंतर लगेचच गॅस आणि पोटफुगीची समस्या येऊ लागते. विशेषतः राजमा, हरभरा आणि उडीद डाळ यामुळे खूप गॅस होतो.

आपल्या स्वयंपाकघरात दडलाय व्हिटॅमिन सीचा खजिना, वाचा सविस्तर

तुम्हीही गॅसमुळे कमी डाळी खात असाल तर डाळी भिजवल्यानंतर शिजवायला सुरुवात करा. यामुळे फायबर मऊ होतात आणि डाळी अधिक पचतात.

डाळी किंवा राजमा किती वेळ भिजवायच्या?

तूर डाळ, लाल मसूर डाळ आणि मूग डाळ यासारख्या साल नसलेल्या तुटलेल्या डाळी शिजवण्यापूर्वी किमान ३० मिनिटे भिजवायच्या.

साल असलेल्या डाळी कमीत कमी २-४ तास पाण्यात भिजवायच्या. काळी उडीद डाळ, मूग साल डाळ, पाण्यात भिजवल्याने त्यांचे फायबर मऊ होते आणि ते पचण्यास सोपे होते.

Health Tips – सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

हरभरा डाळ देखील २ ते ४ तास पाण्यात भिजवायची.

अख्खे मूग, अख्खे मसूर, अख्खे उडीद आणि लोबिया यासारख्या डाळी किमान सहा ते आठ तास भिजवाव्यात.

राजमा, हरभरा आणि काळे उडीद यासारख्या जड डाळी रात्रभर पाण्यात भिजवाव्यात. यात भिजवताना एक तमालपत्र, १ मोठी वेलची आणि लांब मिरची घालावी आणि भिजवावी.