असं झालं तर… तुमच्या समोर अपघाती मृत्यू झाला

  • देशभरात रस्ते अपघाती मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. रस्ते अपघात होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. प्रवासात जर तुमच्या समोर अशी घटना घडली तर…
  • जर तुमच्या समोर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला असेल तर काय कराल, यासंबंधी जाणून घेऊया. सर्वात आधी तत्काळ 100 या नंबरवरून पोलिसांना कळवा.
  • जर तो व्यक्ती मृत्यू पावला नसेल तर घटनास्थळी रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवा 108 वर संपर्क साधा. जखमी व्यक्तीला आधार द्या.
  • मृत कुटुंबीयांच्या व्यक्तीला यासंबंधी फोन करून माहिती द्या. घटनास्थळी अनावश्यक गर्दी होणार नाही, याची काळजी घ्या.
  • अपघातात तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर विम्याच्या दाव्यासाठी विमा कंपनीशी संपर्क साधा. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवा.