
गोवा राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची साखळी रोखण्यासाठी गोवा राज्याने तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोवा हद्दीत असलेल्या पेट्रोल पंपावर सिंधुदुर्गातील विशेषतः दोडामार्ग तालुक्यातील लोकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
गोव्यातील प्रवेश हा काही अटी-शर्तीवर देण्यात आला होता. केवळ पेट्रोल भरण्यासाठी प्रवेश होता. मात्र आता हीसुद्धा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांचे हाल झाले आहेत. कफ्र्यू लावणे ठीक, परंतु पेट्रोलसारखी गोष्ट किमान नाकारू नका, त्या ठिकाणी जाण्यास विरोध करू नका, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सिंधुदुर्गात पेट्रोलचा दर 88 रुपये 88 पैसे आहे; मात्र गोवा राज्यात हाच दर 80 रुपये प्रति लिटर असा असल्याने तिथून पेट्रोल भरणे या काळात तरी फायद्याचे आहे.



























































