
कोरोनामुळे मागील दोन वर्षे डोंबिवलीतील स्वागतयात्रा खंडित झाली होती. मात्र या वर्षी प्रशासनाने स्वागतयात्रेला परवानगी दिली आहे. शहरातील प्रमुख 75 ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून गुढीपाडव्याचे स्वागत केले जाणार आहे.
नेहमीप्रमाणे भागशाळा मैदानाऐवजी डोंबिवली पश्चिमेच्या पंडित दीनदयाळ मार्गावरील मारुती मंदिरापासून ही पालखी निघणार असून कोपर ब्रिजमार्गे, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, अप्पा दातार चौक येथे समाप्त होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून संस्कार भारतीतर्फे 75 कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत सुबक अशा 75 रांगोळ्या काढणार आहेत. यावेळी कोरोना योद्ध्यांचा सन्मानही केला जाणार आहे.
























































