सुंदर चेहरा अन् ‘मशीनगन’ सारखे ओठ, सेक्रेटरीबद्दल ट्रम्प यांचे वादग्रस्त वक्तव्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव पॅरोलिन लेविट यांचे कौतुक करताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. पॅरोलिन लेविट ही एक चांगली प्रेस सचिव असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी तिचा सुंदर चेहरा आणि ओठांची प्रशंसा केली.

पेनिसिल्वियातील रॅलीत ट्रम्प यांनी आपल्या सरकारच्या आर्थिक यशाबद्दल भाषण केले. भाषण करताना ते मुद्दय़ांपासून भरकटले आणि 28 वर्षीय सेक्रेटरीवर बोलू लागले. ते म्हणाले, आज आम्ही सुपरस्टार पॅरोलिनाला घेऊन आलोय. ती ग्रेट नाही का. ती जेव्हा वृत्तवाहिन्यांवर जाते, तेव्हा ती सगळ्यांना भारी पडते. तिचा सुंदर चेहरा आणि ‘मशीनगन’सारखे ओठ थांबत नाहीत. यावेळी ट्रम्प यांनी वेगवेगळे आवाजही काढले. त्यामुळे उपस्थितांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहीले.

याआधीही ट्रम्प यांनी पॅरोलिना लेविटचे असेच काwतुक केले होते. त्यावेळीही अनेकांना नाराजी व्यक्त केली होती.  लेविट यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात म्हणजे 2019 ते 2021 पर्यंत असिस्टंट प्रेस सेक्रेटरी म्हणून काम पाहिले होते.