
सामना ऑनलाईन । मुंबई
मालाड मधील दालमिया महाविद्यालयातील लियो क्लब ऑफ मालाड बोरिवली आणि एन एन एस युनिट बी-२६ च्या मुलांनी मिळून एक नवीन उपक्रम राबविला आहे. ‘एक किताब एक कलम’ असं ह्या उपक्रमाचे नाव आहे.
या उपक्रमाचा उद्देश गरजू मुलांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे असा आहे. यासाठी त्यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की, कमीत कमी एक किताब आणि एक कलम तरी प्रत्येकाने ह्या गरजू मुलांकरिता द्यावे.
हा उपक्रम 15 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या कालावधीत प्रत्येक नागरिक आपला मदतीचा हात ह्या मुलांसाठी पुढे करतील अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे त्यासाठी आपला हातभार लागावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
































































