टीप्स हे टाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वेगाने वाढते. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते.
  • रात्री खूप उशिरा जेवणे आणि लगेचच झोपणे यामुळे वजन वाढते. या सवयीमुळे रक्तातील साखर अनियंत्रीत राहिल्याने मधुमेह होऊ शकतो.
  • दररोज अर्धा तास व्यायाम न केल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण असंतुलित होते. अशा स्थितीत मधुमेह होतो.
  • दैनंदिन आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, मशरुम, फळभाज्या असा पौष्टिक आणि समतोल आहार न घेतल्यास मधुमेह होण्याचे धोका असतो.
  • दिवसभरात आपल्या शरीराला कमीत कमी दीड ते दोन लिटर पाण्याची आवश्यकता असते. यामुळे शरीर हायड्रेट राहात नाही. यामुळे रक्तातील साखर कमी-जास्त होऊन मधुमेह बळावतो.
  • कोल्ड्रींकमध्ये साखर जास्त प्रमाणात वापरली जाते. सतत कोल्ड्रींक प्याल्याने वजन वाढते. मधुमेह होण्यामागे हेही कारण असू शकते.
  • काही जणांना दिवसभर जास्त कॅलरीज असणारे स्नॅक्स, वेफर्ससारखे पदार्थ खाण्याची सवय असते. या सवयीमुळे शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. यामुळे मधुमेह होऊ शकतो.
  • नियमित 7 ते 8 तास झोप न घेतल्याने मेद वाढण्याची समस्या सुरू होऊन मधुमेह होण्याची शक्यता असते.