
रेस्टॉरंटमध्ये डोसा मागवल्यावर त्यासोबत सांबार दिला जातो. बिहारमधील एका रेस्टॉरंटला सांबार न देणे चांगले महागात पडले आहे. जिल्हा न्यायालयाने रेस्टॉरंटला साडेतीन हजार दंड ठोठावला.
हे प्रकरण 2022 सालचे आहे. मनीष पाठक नावाच्या ग्राहकाने मसाला डोसा घरी मागवला होता. त्यासाठी त्याने 140 रुपये मोजले होते. मात्र त्याला सांबार देण्यात आला नव्हता. दुसऱया दिवशी मनिषने रेस्टॉरंटमध्ये जाऊन तक्रार केली. मात्र रेस्टॉरंटमध्ये त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. चूक मान्य न करता अवघ्या 140 रुपयांत रेस्टॉरंट खरेदी करता येणार नाही, असे मनिषला सांगण्यात आले. त्यानंतर मनिषने जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. याप्रकरणाचा नुकताच निकाल आला असून जिल्हा ग्राहक आयोगाने रेस्टॉरंटचालकांना नुकसान भरपाई ठोठावली आहे. सेवेतील कमतरेसाठी 2 हजार रुपये आणि कायदेशीर खर्चाचे 1500 रुपये असे मिळून 3500 रुपये भरण्यास सांगितले.




























































