नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय ‘असे’ डाउनलोड करा ‘आधार कार्ड’

हिंदुस्थानी नागरिक आता UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून नोंदणीकृत मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकतात. UIDAI ही आधार कार्ड क्रमांक उपल्बध करून देणाऱ्या सरकारी संस्थेचे नाव आहे. ज्याच्या वेबसाइटला भेट देऊन आधारशी संबंधित काम तुम्ही घरी बसूनही करू शकता. बँक खाते उघडण्यासाठी, वाहनांची नोंदणी, गृहकर्ज मिळवण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक असते. म्हणूनच ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्हीमध्ये आधार कार्डचे इतके महत्वाचे आहे.

पूर्वी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक होते. तुमचा नोंदणीकृत फोन नंबर जवळपास नसला तरीही आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते. चला तर जाणून घेऊ संपूर्ण प्रक्रिया…

1: UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2: होम पेज वरून ‘माय आधार’ पर्याय निवडा. यानंतर वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या मेनूवर क्लिक करा.

3: ‘माय आधार’ वर दिलेल्या Order Aadhaar Reprint क्लिक करा.

4: यानंतर, आधार क्रमांक किंवा virtual identification क्रमांक (VID) प्रविष्ट करा.

5: त्यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि पुढे जा.

6: मोबाईल नंबरशिवाय कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ‘My Mobile number is not registered’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

7: ओटीपी पर्यायी क्रमांकावर येईल, प्रविष्ट केल्यानंतरच वापरकर्त्याला preview चा पर्याय मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या