निसर्गाची अमर्याद उधळण, जहांगीर कलादालनात डॉ. ईशिता यांचे चित्रप्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाची अमर्याद उधळण करणारे डॉ. ईशिता बिश्वास यांचे ‘बाऊंडलेस’ कलाप्रदर्शन मुंबईच्या जहांगीर कलादालनात सुरू आहे. डॉ. ईशिता यांनी आपल्या कल्पनेतील निसर्ग कॅनव्हासवर उतरवला आहे.

डॉ. ईशिता यांना लहानपणापासून चित्रांची आवड होती.  रंगपेटी, रंगीत खडू यांचा वापर करून लहान वयातच त्यांनी निसर्गवैभव कागदावर उतरवले. विविध ऋतूंचे सोहळे, सृष्टी सौंदर्य नजरेत सामावून घेऊन त्यांनी  आपली चित्रनिर्मिती सुरू ठेवली. प्रसिद्ध चित्रकार सयाराम वाघमारे हे  डॉ. ईशिता यांचे गुरू. गुरूंच्या मागदर्शनाखाली त्यांनी विविध माध्यमांचा वापर करून चित्र निर्मिती केली. त्यांचा चित्रांचे सोलो प्रदर्शन 22 नोव्हेंबरपर्यंत जहांगीर कलादालनात सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत निःशुल्क बघता येईल.