आरोग्य- रजोनिवृत्तीसंबंधित गैरसमजुती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>>डॉ. प्रसाद कुलट

रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्राrच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा असतो, जिथे तिचा प्रजनन काळ समाप्त होतो. 45 ते 55 वयोगटातील महिलांना रजोनिवृत्तीला सामोरे जावे लागते. इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने ही प्रािढया सुरू होते. मूड स्विंग्ज आणि थकवा यासारखी लक्षणे उद्भवतात. रजोनिवृत्तीच्या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यादरम्यान हार्मोनल बदलांमुळे लैंगिक इच्छा आणि कार्यातही बदल दिसून येतात.

रजोनिवृत्तीसंबंधी गैरसमज व मार्गदर्शन-  

रजोनिवृत्ती म्हणजे स्त्राrच्या लैंगिक इच्छा आणि आनंदाचा अंत नसणे.

रजोनिवृत्ती ही स्त्राrच्या लैंगिक इच्छांचा प्रवास संपला असे नसून या टप्प्यात होणारे हार्मोनल बदल लैंगिक इच्छेवर परिणाम करू शकतात. याचा अर्थ असा नाही की, स्त्रियांमध्ये लैंगिक क्षमता कमी होते.

सर्व स्त्रिया सारख्याच प्रकारे रजोनिवृत्तीचा अनुभव घेतात. रजोनिवृत्तीचा परिणाम हा प्रत्येक स्त्राrनुसार बदलत असतो. आनुवंशिकता, जीवनशैलीची निवड आणि एकूण आरोग्य यासारख्या घटकांवर अवलंबून असते. रजोनिवृत्तीदरम्यान प्रत्येक स्त्राrला काय अनुभव येतो याबद्दल गृहितक न बांधणे महत्त्वाचे आहे. काहींना हॉट फ्लॅश आणि मूड स्विंग यांसारख्या गंभीर लक्षणांचा सामना करावा लागू शकतो, तर काहींना कोणतीच समस्या येत नाही.

रजोनिवृत्ती केवळ 50 व्या वर्षी येते हा एक गैरसमज आहे. वास्तविक पाहता बहुतेक स्त्रियांना त्यांच्या चाळीशीनंतर आणि पन्नाशीच्या सुरुवातीच्या टप्प्यात रजोनिवृत्ती येते. वैद्यकीय परिस्थितीमुळे किंवा हिस्टेरेक्टॉमी किंवा केमोथेरपीमुळे अकाली रजोनिवृत्ती येऊ शकते.

रजोनिवृत्ती म्हणजे वजन वाढणे. 

हा देखील एक गैरसमज महिला वर्गामध्ये पाहायला मिळतो. हे खरे नसून रजोनिवृत्तीदरम्यान हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढू शकते. एका विशिष्ट वयानंतर आपले वजन नियंत्रित करणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते. तथापि, जर एखाद्या स्त्रीने निरोगी आहार आणि नियमित व्यायामाची दिनचर्या पाळली तर ती रजोनिवृत्तीदरम्यान इष्टतम वजन राखण्यास सक्षम असेल.रजोनिवृत्तीदरम्यान हार्मोनल थेरपी घेतल्याने समस्या वाढू शकतात.

हे चुकीचे आहे. हार्मोनल थेरपी प्रत्येकासाठी योग्य नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या थेरेपीची निवड करणे योग्य राहील. वेळोवेळी डॉक्टरांशी चर्चा करणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे गरजेचे आहे.

एकाच प्रकारची औषधे सरसकट सर्वांसाठी अनुकूल ठरत नाहीत.

व्यक्तीचे वय, लक्षणे आणि कोणत्याही वैद्यकीय शस्त्रािढयेच्या इतिहासानुसार औषध आणि त्यांचे डोस वेगवेगळे असू शकतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 

(लेखक पुणे येथील अंकुरा हॉस्पिटलमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत)