
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई युनिटने भोपाळमधील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. डीआरआयने कारवाई करून 92 कोटी रुपयांचे एमडी जप्त केले. एमडी कारखान्यामधील मुख्य सूत्रधार हा अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचे समजते. तसेच या कारखान्यासाठी मुंबई आणि सुरत येथून हवालामार्फत पैसे गेल्याचे समजते.
भोपाळमधील एमडी कारखान्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर डीआरआयने एक विशेष ऑपरेशन हाती घेतले. डीआरआयने उत्तर प्रदेशच्या बस्ती येथील ड्रग्जच्या तस्करीत सक्रिय असलेल्या एकाला अटक केली. तो भिवंडी येथून भोपाळला ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल पुरवत असायचा. भिवंडी येथून भोपाळला कच्चा माल पुरवठा करणाऱया दोघा पुरवठादारांची माहिती मिळाली. त्याआधारे दोघांना मुंबईत अटक केली.